Exam-Oriented-Current-Affairs-Dated-31-05-2016-www.KICAonline.com-Marathi
नवी दिल्ली : एक जूनपासून आता हॉटेलचे खाणे, मोबाईलवर बोलणे, विमानाने आणि रेल्वेने फिरणे यासर्व सेवा होणारेत महाग. कृषि कल्याण (केकेसी) उपकरमध्ये अर्ध्या टक्क्याने वाढ झाल्याने या सर्वसेवा महागणार आहेत. केकेसी आता १५ टक्के होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ जूनपासून पाच देशांचा दौरा करणार आहेत. त्या दौर्यादरम्यान, नरेंद्र मोदी अफगाणिस्नानला भेट देवून तेथील भारतनिर्मित सलमा धरणाचे उद्घाटन करणार आहेत. नरेंद्र मोदी दौर्याची सुरुवात अफगाणिस्तानपासून करणार आहेत. तेथून ते कतार आणि कतारमधून स्वित्झर्लंडला पोहोचणार आहेत. सलमा धरण... भारत सरकारच्या वाप्कोस लिमिटेड या
उत्तर कोरियाने केलेली क्षेपणास्त्राची प्रक्षेपण चाचणी अयशस्वी झाली आहे, असे दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफच्या वरीष्ठ अधिकार्यांनी सांगितले आहे. उत्तर कोरियाने आज पहाटे पाच वाजून वीस मिनिटांनी क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केले. मात्र, हे प्रक्षेपण अयशस्वी ठरले. उत्तर कोरिया क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी सतत प्रयत्नात आहे. उत्तर कोरिया अनेकदा नियम
मुंबई: आतापर्यंत ‘विकसनशील‘ गटात मोडणारा भारत देश लवकरच दक्षिण आशियातील ‘कमी-मध्यम उत्पन्ना‘चा देश म्हणून ओळखला जाऊ शकतो. सध्या जगभरातील देशांचे आर्थिक भरभराट आणि राहणीमानाच्या आधारावर विकसित आणि विकसनशील असे दोनच गट पडतात. परंतू जगभरातील अर्थव्यवस्थांची नेमके, अधिक स्पष्ट वर्गीकरण करण्यासाठी जागतिक बँकेने नवी आर्थिक परिभाषा स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली, दि. 31- अॅडमिरल सुनील लांबा यांनी आज भारतीय नौदल सेनेच्या प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. एडमिरल आर. के. धवन हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी या पदाची जबाबदारी आता सुनील लांबा यांना देण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय समुद्राच्या सीमेची सुरक्षा कडेकोट करण्याला प्राथमिकता देणार असल्याचं यावेळी सुनील लांबा यांनी सांगितलं.
जगभर तंबाखू सेवनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने १९८८ पासून ३१ मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला़ संघटनेच्या अहवालानुसार सन २०२० ते २०३० या कालावधीत जगातील १०० कोटी लोक तंबाखूपासून होणाऱ्या रोगामुळे मरतील़ याशिवाय तंबाखू सेवनाने मनुष्याचे आयुष्य तब्बल ९ ते ११ वर्षांनी कमी होईल.
इंग्लंड टीमचा कॅप्टन ऍलिस्टर कूकनं सचिन तेंडुलकरचं रेकॉर्ड तोडलं आहे. सर्वात लहान वयामध्ये दहा हजार रन बनवण्याचं सचिनचं 11 वर्षांपूर्वीचं हे रेकॉर्ड कूकनं तोडलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी कूकनं हा मान पटकावला. 128 टेस्ट मॅच खेळल्यानंतर कूकनं दहा हजार रनचा टप्पा ओलांडला आहे. वयाची 31 वर्ष 5 महिने आणि 5 दिवसांचा असताना कूकनं हे रेकॉर्ड केलं आहे. सचिन तेंडुलकरनं 31 वर्ष 10 महिने आणि 20
’ पुरस्कारांवर रूटची छाप ’ रहाणेला विशेष पुरस्कार ’ दिलीप वेंगसरकर यांना जीवनगौरव क्रिकेटजगतामधील मानाच्या सीएट वार्षिक पुरस्कारांवर इंग्लंडचा फलंदाज जो रूटने दोन पुरस्कार पटकावून छाप पाडली. वर्षांतील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि फलंदाज असे दोन पुरस्कार त्याला देण्यात आले. वर्षांतील सर्वोत्तम ट्वेन्टी-२० क्रिकेटपटूचा पुरस्कार भारताच्या विराट कोहलीने मिळवला. याशिवाय भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना माजी कर्णधार सुनील
वर्ध्यामधील पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडाराला सोमवारी रात्री उशीरा अचानक लागलेल्या आगीत २ लष्करी अधिकाऱयांसह २० जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दारुगोळा भांडारात लागलेल्या आगीनंतर भीषण स्फोट झाला. या स्फोटात त्यांचा मृत्यू झाला. स्फोट इतका भयंकर होता काही किलोमीटरवरूनही आगीचे लोट स्पष्ट दिसत होते. स्फोटात २० जवान जागीच ठार झालेत, तर लेफ्ट. कर्नल आरएस पवार आणि मेजर के.मनोज या दोन लष्करी
No comments:
Post a Comment